केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहा यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी किनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्कतःचं किलगीकरण कराकं आणि आपली चाचणी करून घ्याकी, असे आवाहन शहा यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

राजधानी दिल्लीतील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अमित शहा यांनी स्वतः कमान सांभाळत तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जातीने लक्ष घातले होते. या निमित्ताने सतत आयोजित बैठकांच्या निमित्ताने ते अनेकांच्या संपर्कात आले. याच दरम्यान कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असल्याने त्यांनी चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अमित शहा हे लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. प्रत्येक आव्हानांपुढे शहा यांची दृढता आणि इच्छाशक्ती हे एक नेहमीच उदाहरण आहे. कोरोनाच्या या मोठय़ा आव्हानाकरदेखील आपण विजय प्राप्त कराल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या उद्रेकापासून होते  देशातील स्थितीवर लक्ष ठेवून

हिंदुस्थानात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून गृहमंत्री अमित शहा सतत देशातील कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवून होते. गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या बैठक आयोजित करत नियमितपणे कोविड-19च्या स्थितीचा आढावा ते आतापर्यंत घेत आले आहेत. लॉकडाऊननंतर अनलॉकच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यामध्येही शहा यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मोदी-शहा शेजारी शेजारी

गेल्या बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. यावेळी अमित शहा पंतप्रधानांच्या संपर्कात आले होते. शिवाय या बैठकीनंतर मोदी व शहा यांच्यात 15 मिनिटे खासगीत चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही क्वारंटाइन व्हावे लागेल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी क्वारंटाइन व्हावे, असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे त्यामुळे जेमतेम चार दिवसापूर्वी अमित शहा यांच्या संपर्कात आलेले संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळच क्वारंटाइन करावे लागण्याची शक्यता आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून सदिच्छा दिल्या आहेत. अमित शहा हे कोरोना पॉझिटिव्ह असून रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे हे समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ते लवकरात लवकर बरे व्हावेत व नेहमीच्या उत्साहाने काम करावेत अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.