99 वर्षांच्या आजीबाईंनी उडवले विमान, जगातील वयोवृद्ध पायलट म्हणून गिनीज बुकात नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमचे वय कितीही असू दे, कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही वयात तुम्ही चमकदार कामगिरी करू शकता. कॅलिफोर्निया येथे राहणार्‍या 99 वर्षीय आजीबाईंनी हे सिद्ध करून दाखवलंय. रॉबिना अ‍ॅस्टी असे आजींचे नाव असून त्या जगातील सर्वात जास्त वयाच्या फ्लाइट इन्स्ट्रक्टर आणि सक्रिय पायलट ठरल्या आहेत. रॉबिना यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये झालीय. त्यांनी नुकतेच नेक्स्टजेन फ्लाइट अ‍ॅकॅडमीसाठी अखेरचे उड्डाण घेतले होते. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मोठी झेप घेता येते. वयोवृद्ध नागरिकदेखील मनानं कणखर असतात. उतारवयात त्यांचे योगदान कमी लेखून चालणार नाही, असा संदेशच जणू रॉबिना यांनी जगाला दिलाय. याआधी सर्वाधिक वयाचे पायलट होण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या आयावो प्रांतातील 98 वर्षीय व्यक्तीच्या नावे होता.