
राज्यातील मुदत संपलेल्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींकर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकांवर उद्या मंगळकार पासून न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याबाबत 13 जुलै रोजी अध्यादेश काढला आहे. महाराष्ट्रात 28 हजार 813 ग्रामपंचायती असून त्यापैकी 1566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून दरम्यान संपली आहे तर 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते नोव्हेंबर दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येऊ नये या मागणीसाठी सुमारे 21 याचिका हायकोर्टाच्या मुंबई, संभाजीनगर, नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण भुयान आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. त्याकेळी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना महाधिकक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी खंडपीठाला सांगितले की मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने या याचिकांकर एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठाला दिले आहेत. त्यानुसार इतर दोन याचिका न्यायमूर्ती शिंदे यांच्या खंडपीठाकडे कर्ग करण्याचे आदेश हायकोर्टाने मंगळवारी दिले.


























































