
गेले तीन दिवस मुंबईला झोडणाऱ्य़ा पावसाचा जोर आज चौथ्या दिवशी बऱ्य़ापैकी ओसरला. मात्र, ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार दिवसभर कायम होती. दरम्यान, मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत 60 ते 70 किलोमीटर वाऱ्य़ासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
मुंबईत आज शहरात दोन, पश्चिम उपनगरात 7 तर पूर्व उपनगरात एक अशा एकूण दहा ठिकाणी घर आणि भिंत पडण्याच्या घटना घडल्या. मुंबईत एकूण 215 ठिकाणी फांद्या आणि झाडे पडली. यात शहरात 168, पश्चिम उपनगरात 31 आणि पूर्व उपनगरात 16 घटनांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईत 4, पूर्व उपनगरात 1 आणि पश्चिम उपनगरात 4 अशा एकूण 10 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, पावसाचा जोर ओसल्यामुळे बाजारपेठा उघडल्या. मात्र, मोजक्याच दुकानदारांनी दुकाने उघडली. मात्र, ग्राहकांनी आजही सलग दुसऱ्य़ा दिवशीही दुकानांकडे पाठ फिरवली. ढगाळ वातावरणामुळे लोकांनीही घराबाहेर न पडणेच पसंत केले. सार्वजनिक वाहतुकीबरोबर रस्त्यावर खासगी वाहनांची वर्दळ होती. रेल्वे, रस्ते आणि बेस्ट बस वाहतूक सुरळीत सुरू होती.
शॉक लागून एकाचा मृत्यू
बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसात दहिसर (पूर्व) येथे एका व्यक्तीचा विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. दहिसर पूर्व येथील आनंद नगरातील एन.एल. कॉम्प्लेक्सच्या माईल स्टोन सोसायटीमध्ये विजेचा शॉक लागून शंभू सोनी (38) व्यक्तीला शॉक लागला. त्यांना तात्काळ कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रभादेवीच्या ओमकार इमारतीच्या दोन मजल्यांच्या भिंती कोसळल्या
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात प्रभादेवीच्या ओमकार इमारतीतील दोन मजल्यांवरील भिंती कोसळल्याची घटना घडली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने त्यात कुणीही जखमी झाले नाही.
प्रभादेवीच्या रचना संसद महाविद्यालयाजवळील साई भक्ती मार्गावर ही इमारत आहे. तळमजल्यापासून तीन मजली असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्य़ा व तिसऱ्य़ा मजल्यावरील भिंत कोसळून पडली. घटना घडताच सर्व रहिकाशी इमारतीबाहेर पळाले.
मस्जिद स्टेशनजकळ शॉक लागून ट्रकमनचा मृत्यू
सॅण्डहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकांदरम्यान ट्रककर पाणी भरल्याने लोकलमध्ये अडकलेल्या 290 प्रवाशांसाठी रेल्वे सुरक्षा बल आणि एनडीआरएफच्या टीमने काल रात्री यशस्वी सुटका केली असली तरी या घटनेने चार लोकलच्या मोटरमध्ये पाणी गेल्याने त्या नादुरूस्त झाल्या आहेत. तसेच मस्जिद स्थानकांत पाणी उपसण्यासाठी लाकलेल्या मोटर पंपाचा शॉक लागून मध्य रेल्वेच्या ट्रकमनचा मृत्यू झाला आहे.
मध्य रेल्वे च्या सँण्डहर्स्ट रोड आणि मस्जिद स्थानकादरम्यान पाणी भरल्याने बुधवारी दोन लोकल अडकून पडल्या. त्यातील एकूण 290 प्रवाशांचे रेल्वे सुरक्षा बल आणि एनडीआरएफच्या टीमने रात्री दहा काजेपर्यंत राबकिलेल्या मोहिमेत सुटका केली. यानंतर मध्यरात्री 2.45 वाजता रेल्वे चा ट्रॅकमन संजित कुमार (27) हा ट्रॅक मधील पाणी काढण्यासाठी बसविलेला पंप चेकींग करण्यासाठी गेला असता त्यास वीजेचा जबर शॉक लागला. कंत्राटदार पंप ऑपरेटर कमलेश यालाही शॉक बसला परंतु तो सुदैवाने बचावला.






























































