मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीपासून 25 ठिकाणी वृक्षारोपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचे वाढते प्रमाण आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मानवी शरीराला आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचे, प्राणवायूचे प्रमाण वाढावे, यासाठी मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ, कलानिधी आणि मातृभूमी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या कला संस्था आणि कलाकारांच्यावतीने मुंबईसह महाराष्ट्रात 25 ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. मुंबईत 12 ऑगस्टला दहिहंडीपासून याची सुरुवात होणार आहे.

मुंबईसह अनेक शहरांमध्ये झाडे कमी असल्यामुळे प्राणवायूची कमतरता निर्माण झाली आहे. त्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन असणे आवश्यक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर, ‘25 थरांची दहीहंडी… वृक्षारोपणाची’ ही अनोखी संकल्पना वृक्षमित्र विक्रम यंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. मुंबईतील विक्रोळी पूर्व येथून याची सुरुवात होणार असून पनवेल, कर्जत, कसारा या पट्टय़ात तब्बल 25 ठिकाणी कलाकारांच्या मदतीने आणि सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम राबवला जाणार आहे. दरम्यान, मुंबईतील नऊ समुद्रकिनाऱयांचीदेखील स्वच्छता कलाकंत परिवाराकडून केली जाणार आहे. याची सुरुवात दादर येथील कीर्ती महाविद्यालयाजवळून होणार आहे.