
विकी कौशल हा सध्याचा टॉपच्या बॉलिवूड अभिनेता आहे. उरी, संजू, राजी यासारखे हिट सिनेमा त्याच्या वाटय़ाला आले. ऑनस्क्रीन तो जितका गाजतो, तितका तो ऑफस्क्रिनही सुपरहिट ठरतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघून याची प्रचीती येते. शनिवारचंच उदाहरण घ्यायचं तर विकीने शनिवारी स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देताना त्याच्यातील कलेचं अनोखं दर्शन चाहत्यांना घडवलं. ही कला म्हणजे सतार कादन. विकीच्या सतार वादनाचा हा व्हिडियो चांगलाच व्हायरल होत आहे.
सफेद कुर्ता-पायजमा घालून पारंपरिक अंदाजात सतार वाजवणारा विकी चाहत्यांना भलताच आवडला. सतारवर त्याने ‘ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू…’ हे गाणे वाजवले. अवघ्या 25 मिनिटांत या व्हिडियोला अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आणि शेअर केले. चाहत्यांनी विकीच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्काची भरूभरून प्रशंसाही केली.
विकीच्या वर्कप्रंटबद्दल सांगायचं तर त्याचे अनेक सिनेमा रांगेत आहेत. त्यापैकी सर्वात जास्त चर्चेत आहे ‘सॅम माणेकशॉ’ हा सिनेमा! या सिनेमाचा फर्स्ट लुक आलाय. यात विकी जबरदस्त अंदाजात दिसत आहे. ‘सॅम माणेकशॉ’ सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.





























































