
गणेश विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्या ‘डी’ विभागाने भाविकांना विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. नोंदणी करताना त्यासाठी तारीख, वेळ, विसर्जन स्थळ आदींची माहिती नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे विसर्जन स्थळावरील भाविकांच्या संख्येचा अंदाज घेता येणार आहे.
विर्सजनासाठी गिरगाव चौपाटीवर येणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गर्दी टाळण्यासाठी पालिकेच्या ग्रँट रोड येथील ‘डी’ वॉर्डात विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी भाविकांना गिरगाव समुद्रकिनाऱयासह कृत्रिम तलावावर विसर्जनासाठी येणाऱया भाविकांना shedreeganeshviedsarajn.com वर नोंदणी करावी लागणार आहे.



























































