
हिंदुस्थानने कोरोना विषाणूशी कडवा प्रतिकार दिला असून महामारीतील संभाव्य मोठी मनुष्यहानी रोखण्यात यश आले आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर आणखी घसरून 1.93 टक्क्यांवर आला आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे. कोरोना लढय़ात केंद्र सरकार आणि राज्यांनी योग्य समन्वयातून केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी केला.
देशातील कोरोनाबळींचा आकडा 156 दिवसांनंतर 50 हजारांच्या आसपास गेला आहे. याउलट अमेरिकेत अवघ्या 23 दिवसांत, ब्राझिलमध्ये 95 दिवसांत, तर मेक्सिकोमध्ये 144 दिवसांत 50 हजार लोकांचा कोरोना महामारीत मृत्यू झाला होता. हिंदुस्थानात 18 जूनला कोरोनाचा मृत्यूदर 3.33 टक्क्यावर होता. देशाचा मृत्यूदर जगात सर्वात निच्चांकी 1.93 टक्क्यावर घसरला आहे.
























































