
धाराशिव जिल्ह्यात आज शुक्रवारी 161 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 223 झाली आहे. 78 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले असून जिह्यात 4 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातून संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत संशयीत रुग्णांचे 304 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. यामध्ये 151 निगेटीव्ह, 97 पॉझिटीव्ह, 56 अहवाल अनिर्णित आहेत. तसेच 799 अँटीजेन किट टेस्टींगमध्ये 64 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 161 झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये धाराशिव तालुक्यात 43, तुळजापूर 15, उमरगा 35, कळंब 24, परंडा 13, लोहारा 5, भूम तालुक्यात 18 तर वाशी तालुक्यात 8 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 4 हजार 223 झाला आहे. 2 हजार 452 कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून 1 हजार 651 रुग्णांवर जिह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील 24 तासात 4 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाचा आकडा 120 झाला आहे. रॅपिड अँटिजेटि टेस्टमध्ये कळंब पोलीस ठाण्याचे पंधरा पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
24 तासात चाळीस पॉझिटीव्ह
कळंब तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली असुन चोवीस तासात चाळीस रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असुन यात कोरोना योध्दे म्हणुन गणल्या जाणाऱ्या पंधरा पोलिसांचा समावेश आहे.




























































