
विकासकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैशाची मागणी करणाऱया आरटीआय कार्यकर्त्यासह आणखी एखाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. विकासकाला खोटय़ा आरोपात फसवल्याची बाब लक्षात घेऊन न्यायमूर्ती पृथ्कीराज चव्हाण यांनी दोघांचाही अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
पुण्यातील विकासक कर्नाटकी सुधीर कर्नाटकी यांची एका 34 वर्षीय महिलेशी 2007 साली ओळख झाली. सदर महिलेने ओळखीचा फायदा घेत कर्नाटकी यांच्या मदतीने नोव्हेंबर 2013 साली थ्री बीएचके बावधन येथे फ्लॅट विकत घेतला त्या फ्लॅटचे कर्नाटकी हे सह मालक होते. 2019 साली महिलेने कर्नाटकी यांना खोटय़ा बलात्कार प्रकरणात फसवण्यास सुरुवात केली तसेच त्यांच्या कडे 6 लाख रुपये व फ्लॅटची पूर्ण मालकी देण्याचा तगादा लावला. सूत्रधार आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे आणि अमोल चव्हाण या दोघांनी कर्नाटकी यांच्याकर दबाव आणत त्या महिलेची मागणी पूर्ण करण्यास भाग पाडले. त्यानंतर चव्हाण व त्या महिलेने डिसेंबर 2019 साली 2 कोटी आणि महिलेच्या नावाने खरेदी केलेल्या पुण्यातील एका प्लॉटचा ताबा मागितला त्यानंतर कर्नाटकी यांनी कोथरूड पोलीस ठाणे गाठत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींनी अटक होऊ नये म्हणून हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जाकर न्यायमूर्ती पृथ्कीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

























































