
परभणीत आज कोरोनाचे 85 रुग्ण सापडले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 104 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 हजार 174 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून 875 रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तसेच 104 बाधित मृत्यूमुखी पडले असून रुग्णालयातील संक्रमित कक्षात 1 हजार 199 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत एकूण 13 हजार 431 संशयितांचे स्वॅब घेतल्या गेले असून त्यातील 10 हजार 986 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर 2 हजार 174 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 169 स्वॅब अनिर्णायक असून 62 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. 40 स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहे.



























































