
अमेरिका एफडीएचे प्रमुख स्टीफन हॉन यांनी प्लाझ्मा थेरपीबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अखेर माफी मागितली आहे. स्टीफन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणिबाणी परवाना जाहीर करण्याचे संकेत देताना कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातून अॅण्टीबॉडीज घेण्याचे जाहीर केले होते. या निर्णयाला वैद्यकीय क्षेत्रातून अनेकांकडून टीकेची झोड उठविली गेली. एकीकडे प्लाझ्मा थेरीपीच्या उपचाराबाबत साशंकता व्यक्त होत असताना अशा प्रकारचा निर्णय घेणे हे चुकीचे मानले जात आहे. त्यामुळे स्टीफन यांच्या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. प्लाझ्मा थेरेपीचा वापर केल्यास 100 पैकी 35 रुग्णे वाचू शकतील, असे वक्तव्य केले होते. मुळात हे प्रमाण चुकीचे असल्याची टीका केली जात आहे. ज्या प्रयोगशाळेत या चाचण्या केल्या जात आहेत. त्यांनी देखील हे प्रमाण चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते.

























































