परभणीचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे परभणीतील खासदार संजय जाधव यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण राजीनामा दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

परभणी व जालना जिल्हय़ात राष्ट्रवादीकडून गळचेपी सुरू आहे. शिवाय जिंतूर आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत राष्ट्रवादीने शिवसेनेकडे दुर्लक्षच केल्याचे संजय जाधव यांनी सांगितले. राष्ट्रवादीची एकतर्फी भूमिका आणि निर्णय पूर्णतः चुकीचा असल्याचे जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

संजय जाधव हे 2009 ते 2014 दरम्यान परभणीतून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. केंद्र सरकारच्या स्थायी समिती आणि कृषी मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.