अकरावीच्या विद्यार्थ्याने बनविले कॅश सॅनिटायझर यंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रसार रोखण्यासाठी सतत हात धुवा, हाताला सॅनिटायझर लावा, मास्क लावा असे अनेक उपाय सध्या केले जात आहेत. तरीही खरेदी विक्रीत होणारी नोटांची, नाण्यांच्या देवाण घेवाणीतूनही पैशाच्या नोटाद्वाराही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या नोटा सॅनिटायझेशन करणे दुकानदारांसमोर सध्या जिकरीचे काम होवुन बसले आहे. पण, यावर कासार्डेतील दिग्विजय मुकुंद जाधव या अकरावीच्या विद्यार्थ्यांने भन्नाट शोध लावला असून त्याने कोरोना बरोबरच इतरही विषाणुचा नायनाट करणारे ‘कॅश सॅनिटायझर’ छोटेशे यंत्र बनवले आहे.

कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डेमधून नुकताच दहावी शालांत परीक्षेत 98.80 गुणाने जिल्ह्यात पाचवा व राज्यात सातवा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या दिग्विजय मुकुंद जाधव याने अतिशय उपयुक्त असे हे यंत्र बनविले असून त्यामुळे कॅश ड्रॉव्हर उघडताच सर्व कॅश सहज सॅनिटायज होत आहे. हे यंत्र सध्या त्याच्या वडीलांच्या कासार्डे तिठा येथील मारूती मेडिकल स्टोअर्स मध्ये प्रत्यक्षात कायर्रत आहे.

सध्या अनेक दुकानदारांना हाताने कॅश सॅनिटाय करून व्यवहार करताना फार त्रासदायक ठरू लागले आहे आणि यातून कोरोना विषाणूचा प्रसारही होवू शकतो. कासार्डे पीएचसीच्या मेडिकल ऑफिसर डॉ. सौ पि.एन. इंगवले मॅडम यांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरणे तसेच काउंटर निर्जंतुक करणे याविषयी मेडिकल स्टोअर्समध्ये येऊन दिग्विजयचे वडील मुकुंद जाधव यांना काही सूचना दिल्या होत्या तसेच कॅश निर्जंतुक करण्यासाठी काही करता येईल का अशी विचारणा केली होती.

अतिशय सुरक्षित कॅश सॅनिटायझर सिस्टिम
अल्ट्रावायलेटचा प्रकाश नियमित शरीरावर पडला तर कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच डोळ्यांवरही सतत पडत असेल तर डोळ्यांनाही इजा होवू शकते पण, दिग्विजय जाधव या विद्यार्थ्यांने बनविलेली ही कॅश सॅनिटायझर सिस्टीम मुळातच ड्रॉव्हरलाच फिट केली असून ड्रॉव्हर उघडताच लाईटच्या स्विच बंद होतो व ड्रॉव्हर बंद करताच स्विच सुरू होत असल्याने अतिशय सुरक्षित आहे, कमी खर्चात आणि 100 टक्के कॅश सॅनिटायझर करणारी ही सिस्टिम आहे.
– डॉ. पी. एम. इंगवले, प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे