
पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून कोंढवा परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना कोंढवा खुर्द परिसरात घडली आहे. याप्रकरणी अक्षय भीमराव कांबळे (वय – 25, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि आरोपीची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. 25 ऑगस्टला अक्षय पेंटीगच्या कामावर जात होते. त्यावेळी आरोपीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी नागरिक भांडण मिटविण्यासाठीमध्ये येऊ लागल्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावर धावत येऊन धमकाविले. कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. नागरिकांना तत्काळ अक्षयला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.






























































