प्रणव मुखर्जींची प्रकृती स्थिर; परंतु चिंताजनक, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे अजूनही कोमातच आहे. त्यांना सतत व्हेंटिलेटरवर ठेवून फुफ्फुसातील संसर्गावर उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर, परंतु चिंताजनक असल्याचे रविवारी डॉक्टरांनी सांगितले. दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुखर्जी हे ‘हीमोडायनेमिकली स्टेबल’ आहेत. अशा परिस्थितीत रुग्णाची प्रकृती स्थिर असते. मात्र रुग्ण गंभीर आजारी असतो. मुखर्जी यांचा रक्तदाब तसेच त्यांचे ह्रदय सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मुखर्जी यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल केले असून त्याच दिवशी त्यांच्या मेंदूतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.