पूर्णवेळ नेतृत्व नसल्याने काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकत नाही, पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुल गांधी जर पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार असतील तर त्यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. सध्या देशाची अर्थव्यवस्था बिकट आहे. त्याशिवाय अन्य काही महत्वाचे मुद्दे असतानाही पक्षाकडे पूर्णवेळ नेतृत्व नसल्याने विरोधी पक्षाची भूमिका योग्यरित्या पार पाडू शकत नाही अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केली.

काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रावर पृथ्वीराज चव्हाण यांचीही स्वाक्षरी आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आम्हाला अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात यश मिळाले पण कर्नाटक व मध्य प्रदेशात सरकार टिकवण्यात अपयश आले म्हणून काँग्रेसला पूर्णवेळ नेतृत्वाची गरज असल्याचा विचार केला आणि पत्राव्दारे आमचे म्हणणे मांडले.

राहुल गांधी यांना पक्षाचे नेतृत्व करायचे नाही. सोनिया गांधी त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारीमुळे पूर्ण वेळ देऊ शकत नाही. म्हणून आम्ही वर्किंग पार्लमेंट बोर्डीची मागणी केली होती आणि त्यात मागणीत काही गैर नाही असे ते म्हणाले.