कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आई-मुलाचे नातेसुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे दुरावल्यासारखे झाले. त्यामुळे आपली नाती तोडू नका, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कुणालाही काळीत टाकण्याची मानसिकता ठेवू नका. शिक्षित व्हावं योग्य ती खबरदारी घ्यावी परंतु नात्यातील, संबंधातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नवा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारी केले.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोनाः अवास्तव भीती व गैरसमज’ याविषयी केलेल्या चर्चेचा तिसरा भाग आज प्रसारीत झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, लोक भीतीपोटी खूप चुका करतात. एखादा कोरोनाबाधीत झाला तर त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. पनवेलमध्ये एका घटनेत आई असिंमटेमॅटिक होती. ती बरी झाल्यानंतर तिला घरात घ्यायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटलं आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. हा आजार बरा होतो मात्र हा आजार झालेल्यांशी काळीत टाकल्याप्रमाणे वागू नका. नातेसंबंध जपत आजारावर मात करा.

80 वर्षांवरील पाच हजार रुग्ण बरे झाले

राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये किमान 5000 रुग्ण असे आहेत ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे. 90 वर्षे वयापुढील जवळजवळ 600 लोक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता सावधतेने आणि काळजी घेऊन त्याचा सामना करा, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

2 ते 3 टक्केच गंभीर

संसर्गाचे प्रमाण जास्त हाकोरोना किषाणूचा मुख्य गुणधर्म आहे. परंतु याची जागतिक टक्केवारी पाहिली तर 80 टक्क्यांपर्यंत लोकांमध्ये लक्षणेच आढळत नाहीत. कोरोनाची तीन स्करूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी 10 दिवस सीसीसीमध्ये (कोरोना केअर सेंटर) राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो. उर्वरित 15 टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही लोकांच्या तोंडाची चव जाते, काही लोकांना जेवावसं वाटत नाही. उर्वरित 2-3 टक्के रुग्णच गंभीर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.