
मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे असे बोलले जाते. या शहराने अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत. या शहरात राहिलेली व्यक्ती या शहराला कधीच विसरू शकत नाही. असेच काहीसे घडले इंफाळ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत आणि त्याने मुंबईतील त्याच्या जीवनाच्या आठवणीत चक्क आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, खोमद्राम गंभीर सिंग हे 1978 साली इंफाळमधून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शोधण्याचे बरेच प्रयत्न केले पण ते सापडले नाही. मात्र तब्बल 40 वर्षानंतर म्हणजे 2018 साली फॅशन डिझायनर फिरोझ शाकीर यांच्या एका व्हिडीओत खोमद्राम हे मुंबईतील रस्त्यावर जुनी गाणी गाताना दिसले. त्यानंतर महिन्याभरात खोमद्राम यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शोधून काढले व इंफाळला परत आणले. सुरुवातीला खोमद्राम हे कुटुंबीयांना भेटल्याने खूश होते. मात्र नंतर नंतर त्यांना मुंबईची आठवण यायला लागली होती. मात्र त्यांचे कुटुंबीय त्यांना पुन्हा मुंबईला पाठवायला तयार नव्हते. कुटुंबीयांनी त्यांना बरे वाटावे म्हणून सर्वोतपरी प्रयत्न केले मात्र त्यांना मुंबईलाच जायचे होते. खोमद्राम याने एकदा मुंबईला जायचा प्रयत्नही केला मात्र त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अडवले.
खोमद्राम हा आमच्या सर्वांसोबत आनंदाने राहत होता. आम्ही त्याची समजूतही काढत होतो. तो त्याच्या गावातल्या मित्रांसोबत गप्पाही मारायचा. त्यामुळे तो असे करेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आम्हाला हा जबरदस्त धक्का आहे, असे खोमद्रामचा भाऊ कुल्लाचंद्र याने सांगितले.
‘

























































