
जम्मू-कश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरच्या बटमालू भागात आज अतिरेकी व लष्कराच्या पथकात जोरदार चकमक उडाली. यात तीन अतिरेक्यांचा खात्मा झाला. चकमकीत ठार झालेले तीनही अतिरेकी अल बद्र या संघटनेचे असल्याचे सांगण्यात आले. या धुमश्चक्रीत एक स्थानिक महिलाही गोळी लागून ठार झाल्याचे राज्याचे पोलीस महानिरीक्षक दिलबाग सिंग यांनी सांगितले.
बटमालू भागात काही अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने गुरुकारी पहाटे अडीच काजता स्थानिक पोलीस, सीआरपीएफच्या मदतीने कोम्बिग ऑपरेशन सुरू केले. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच लष्करानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यात तीन अतिरेकी ठार झाले. अर्शद अहमद खान, माजिद रसूल आणि मोहमंद आसिफ अशी या अतिरेक्यांची ओळख पटली असून तिघेही स्थानिक आहेत. अल ब्रद या संघटनेसाठी हे तिघे काम करत होते. या अतिरेक्यांकडून शस्त्रास्त्रs तसेच इलेक्ट्रिक उपकरणे जप्त करण्यात आली. या चकमकीत कौसर नावाची एक 45 वर्षीय महिलाही ठार झाली.
दगडफेके अवतरले
कलम 370 हटवण्यात आल्यानंतर कश्मिरातून दगडफेके गायब झाले होते. मात्र आज बटमालूत लष्कराच्या कारवाईत दगडफेक्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. लष्कराची कारवाई सुरू होताच दगडफेक्यांनी तुफान दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी अगोदर लाठीमार नंतर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडण्यात आल्या. मात्र तरीही दगडफेक चालूच राहिली.


























































