घाटकोपर यानगृहाच्या दुरवस्थेमुळे कामगार त्रस्त, कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील यानगृहाची दुरवस्था झाली असून त्यामुळे कामगारवर्ग त्रस्त झाला आहे. यानगृहात वेळीच योग्य ती सुधारणा करून कर्मचाऱयांना दिलासा दिला नाही तर यानगृहात ‘काम बंद’ आंदोलन करू, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.

घाटकोपर येथील यानगृहाच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर, कर्मचाऱयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालिकेचे स्थापत्य समिती अध्यक्ष उपेंद्र सावंत आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी यानगृहात भेट दिली. त्यावेळी यानगृहात अस्वच्छता तर आढळलीच, त्याशिवाय इतरही अनेक समस्या समोर आल्या. या सर्व समस्यांवर तातडीने तोडगा काढला नाही तर यानगृहात ‘काम बंद’ आंदोलन करू, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी युनियनचे चिटणीस अजय राऊत, सहाय्यक अभियंता कासारे, कनिष्ठ अभियंता शिंदे उपस्थित होते.