
जमिनीच्या वादातून बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी दोघा जणांना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी राहुल कांबळे, रुपेश कांबळे, गणेश गुऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश हरिदास कानाबारा (वय -63) असे खून झालेल्याचे नाव आहे. विश्वास गंगावणे (वय -32) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश बांधकाम व्यावसायिक होते. त्यांचे बावधन येथील 10 एकर जागेसंदर्भात काहीजणांशी वाद सुरु होते. त्याप्रकरणी काल जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर ते मोटारीकडे चालले होते. त्यावेळी शासकीय कोषागारजवळ हल्लेखोरांनी राजेश यांची गोळी झाडून हत्या केली.
गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाNयांसह बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.



























































