30 मिनिटांत कोरोनाचे निदान शक्य, शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन पद्धत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगात कोरोना महामारीमुळे विविध देशांतील शास्त्रज्ञ लस शोधण्यात गुंतलेले असतानाच आता कोरोनाचे निदान लवकरात लवकर करणे शक्य व्हावे यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन पद्धत विकसित केली आहे. ज्यामुळे कोणालाही अवघ्या 30 मिनिटांत कोरोना विषाणूचा सहज आणि त्वरित शोध घेणे शक्य होणार आहे.

सध्याच्या पीसीआर डायग्नोस्टिक चाचणी इतकीच त्यात अचूकता असणार आहे. दक्षिण कोरियामधील पोहंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी विकसित केलेल्या या सेन्सर तंत्रज्ञानामुळे विषाणूच्या आरएनए क्रमांकावर आधारीत कोरोनाचे निदान झाले आहे. ज्यामुळे एकाच तपासणीच्या जागी येणारा ताण कमी होण्याबरोबरच संक्रमित रुग्णांशी संपर्क साधणे टाळता येऊ शकणार आहे. सेन्सर तंत्रज्ञानाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे डायग्नोस्टिक डिव्हाईस तयार करणे सुलभ आहे जे एक सहज पोर्टेबल आणि वापरण्यास सुलभ फॉर्ममध्ये विकसित केले जाऊ शकते, असे संशोधकांनी सांगितले.