धाराशिवमध्ये शुक्रवारी 109 कोरोना पॉझिटीव्ह, 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्याचा कोरोनाचा बाधीत रुग्णांचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढतच असून आज शुक्रवारीही 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे जिह्याचा मृत्यूदर 3.21 टक्के एवढा झाला आहे. 109 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून 202 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णाचा आकडा 13 हजार 218 झाला आहे. 1 हजार 799 रुग्णावर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातून संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत संशयीत रुग्णांचे 132 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्व स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. यामध्ये 106 निगेटीव्ह, 10 पॉझिटीव्ह 15 अहवाल अनिर्णित तर 1 अहवाल प्रलंबीत आहे. तसेच 744 अँटीजेन किट टेस्टींगमध्ये 81 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तसेच जिल्ह्यातील परंतू बाहेर जिह्यात पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 18 आहे. त्यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 109 झाली आहे.

पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये धाराशिव तालुक्यात 49, तुळजापूर 9, उमरगा 2, लोहारा 7, कळंब 11, वाशी 11, भूम 6 तर परंडा तालुक्यात 24 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 13 हजार 218 झाला आहे. 10 हजार 995 कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून 1 हजार 799 रुग्णांवर जिह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 6 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून जिह्यातील कोरोनाबाधीत मृताचा आकडा 424 झाला आहे.