जादू टोण्याच्यासंशयातून वृद्ध नागरिकाची हत्या, आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंडमध्ये जादू टोणाच्या संशयातून एका वृद्ध नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुलुंडमध्ये मारुती गवळी हे 70 वर्षाचे वृद्ध नागरिक आपला मुलगा सुरेश(नाव बदलेले) सोबत राहत होते. सुरेशला निखिल(नाव बदलेले) हा मित्र होता. मारुती गवळी जादू टोणा करत असल्याचा संशय निखिलल होता. तसेच जादू टोणामुळेच आपले वाईट दिवस आल्याचे निखिललला वाटत होते. एका रात्री निखिलने गवळी यांच्या पोटात सुरा खुपसून त्यांचा खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. एखाद्या गर्दुल्ल्याने गवळी यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता निखिलने आपला गुन्हा कबुल केला.