सहकार सप्ताहाच्या माध्यमातून देशभर होणार ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान’चा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात 14 नोव्हेंबरपासून सहकार सप्ताह साजरा केला जाणार असून त्यामध्ये कोव्हीड-19 आणि आत्मनिर्भर हिंदुस्थानबाबत जागर होणार आहे.

त्यानुसार कोरोना महामारी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि देश सर्वच पातळ्यांवर स्वावलंबी व्हावा म्हणून आठवडाभर विविध कार्यक्रम, चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 14-20 नोव्हेंबर या कालावधीत देशभरातील सहकारी संस्था, त्यांच्याशी संलग्न संघ, कार्यालये, जिल्हा उपनिबंधक, सह निबंधक, जिल्हा बँका, सहकारी बँका, सहकारी फेडरेशननी सहकार सप्ताहाचे आयोजन करावे असे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत.

या सप्ताहासाठी कोरोनाच्या पाश्चत सहकाराची भूमिका आणि जबाबदारी, सहकारी विपणन, ग्राहक, दूरस्थ प्रशिक्षणाद्वारे सहकार प्रशिक्षण, कोरोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी किंवा व्यवसायिक नुकसान झालेल्यांकरिता नवीन संधी हे विषय घेऊन सप्ताह साजरा करावा लागेल.