पूनम पांडेचा काढला अश्लील व्हिडीओ, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे हिचा एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ शूट केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम पांडे गोव्यात शूटिंगसाठी आली होती. तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने तिचा अश्लील व्हिडीओ शूट केला. या प्रकरणी गोव्यातील कैनाकोना पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीविरोधात केला होता गुन्हा दाखल

वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने काही दिवसांपूर्वी तिचा नवरा सॅम विरोधात पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर तिच्या पतीला अटकही झाली होती. या प्रकरणानंतरर तिने ती लग्न मोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर या प्रकरणात पूनम पांडेने युटर्न घेत तिने नवऱ्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता.

‘आम्ही आमच्यातले मतभेद दूर करण्याचे प्रयत्न करत आहोत. आम्ही पुन्हा एकत्र आलोय. तुम्हाला माहित आहे का? आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही वेड्यासारखे एकमेकांवर प्रेम करतो. तुम्ही मला सांगा कोणत्या लग्नात कुरबुरी नसतात’, असे पुनमने एका मुलाखतीत सांगितले होते. सॅमने देखील त्यांच्यातील भांडण मिटले असल्याचे सांगितले होते.