
आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये हिंदुस्थानी संघ व या संघांतील खेळाडूंनी महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर विराजमान असून मुंबईकर रोहित शर्मा दुसऱया स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. हिंदुस्थानी संघ वन डे रँकिंगमध्ये दुसऱया स्थानावर आहे. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे क्रिकेटविश्व ठप्प झाले होते. त्यानंतर इतर ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा पार पडत आहेत, पण हिंदुस्थानी संघ अद्याप आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेला नाहीए.
वन डे रँकिंग (फलंदाज)
विराट कोहली – 871 रेटिंग
रोहीत शर्मा – 855 रेटिंग
बाबर आझम – 837 रेटिंग
रॉस टेलर – 818 रेटिंग
फाफ डय़ुप्लेसिस – 790 रेटिंग
वन डे रँकिंग (गोलंदाज)
ट्रेंट बोल्ट – 722 रेटिंग
जसप्रीत बुमराह – 719 रेटिंग
मुजीब उर रहमान – 701 रेटिंग
ख्रिस वोक्स – 675 रेटिंग
पॅगिसो रबाडा – 665 रेटिंग
वन डे रँकिंग (संघ)
इंग्लंड – 123 रेटिंग
हिंदुस्थान – 119 रेटिंग
न्यूझीलंड – 116 रेटिंग
ऑस्ट्रेलिया – 109 रेटिंग
दक्षिण आफ्रिका – 108 रेटिंग



























































