ऑफिसमध्ये काम सांगितल्यामुळे सहकाऱ्यावर केला चाकूने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑफिसमध्ये काम करत असताना सहकाऱ्याने काम सांगितल्याच्या रागातून त्याच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढव्यातील सिस्टम फायनान्समध्ये घडला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. विघ्नेश चव्हाण (वय 20, रा. बिबवेवाडी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. मोहम्मद मुस्तफा रियाज कुरेशी (वय 24, रा. वानवडी ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नेश आणि मोहम्मद कोंढव्यातील सिस्टम फायनान्समध्ये कामाला आहे. दोघेही शुक्रवारी ऑफिसमध्ये असताना मोहम्मदने विघ्नेशला काम सांगितले. त्याचा राग आल्यामुळे विघ्नेशने मोहम्मदला शिवीगाळ करून त्याच्यावर चाकूने वार केले. याप्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.