टोल फ्री वेगवान प्रवास, प्रदूषण रोखणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कामगार आणि महापालिकेचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांचा प्रवास टोल फ्री, सिग्नलमुक्त वेगवान करणारा आणि वेळ-इंधनाची बचत करणाऱया पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडची पाहणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केsली. महाराष्ट्रासह जगभरात कोरोनाविरोधात जोरदार लढाई सुरू असतानाही कोस्टल रोडचे काम हिमतीने सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी पालिका आणि अविरत मेहनत करणाऱया कामगार-अधिकाऱयांचे काwतुक केले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबईला वेगवान बनवणाऱया पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम सध्या वेगात सुरू आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.98 किमीच्या मार्गासाठी एक हजार कर्मचारी-कामगार-अधिकारी यांच्यासह अत्याधुनिक मशनरीच्या माध्यमातून काम केले जात आहे. विशेष म्हणजे कोरोना काळ, निसर्ग चक्रीवादळाचा धोका असतानाही आवश्यक खबरदारी घेऊन काम सुरू ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केल्याची माहिती सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रियदर्शनी गार्डन येथून या पाहणीला सुरुवात केली. यानंतर अमरसन्स उद्यान, वरळी याठिकाणी पाहणी केली. तसेच टनेल बोअरिंग मशीन, पायलिंग, उभारण्यात आलेल्या जेट्टी यांचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून माहिती घेतल्याचे निघोट यांनी सांगितले.

ग्रीन स्पेस, इंटरचेंज, पार्किंग

कोस्टल रोडमुळे वेगवान प्रवासासोबत 60 हेक्टर ग्रीन स्पेसही वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना हिरव्यागार मोकळ्या जमिनींचा आनंद घेता येईल. या रस्त्यावर 4 ठिकाणी इंटरचेंज असेल. नागरिकांना टोलमुक्त, सिग्नलमुक्त आणि कोणताही कर न आकारता प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. सध्या कोस्टल रोडचे 21 टक्के काम पूर्ण झाले असून जुलै 2023 पर्यंत काम पूर्ण होईल अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वांद्रे ते वर्सेवा या पुढील टप्प्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून वेगवान काम केले जाईल असेही शिंदे म्हणाले.

कोरोना काळातही अडथळ्यांवर मात करून, सर्व प्रकारची खबरदारी घेऊन कोस्टल रोडचे अविश्रांत काम करणाऱया कामगार-अधिकारी, पालिकेला धन्यवाद देण्यासाठी आलो आहे. मुंबईला वेगवान बनवणारा कोस्टल रोडचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी खरोखरच फायदेशीर ठरणार आहे. – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

इंधनाची बचत

कोस्टल रोडमुळे प्रिंन्सेस स्ट्रीट या मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांद्रय़ापर्यंतचा 9.98 किमीचा प्रवास मुंबईकरांना टोल-फ्री, सिग्नलमुक्त रस्त्यावरून वेगात करता येणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूक काsंडीतून सुटका होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे. कोस्टल रोडमुळे वेळेची बचत 70 टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत 34 टक्के होईल. शिवाय ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.