मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 940 रुग्ण, 515 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रविवारी दिवसभरात 940 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 515 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध दीर्घकालीन आजार असलेल्या 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत 18 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 791 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 55 हजार 860 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 199 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 13 हजार 157 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 18 लाख 85 हजार 717 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 82 हजार 814 वर पोहोचली आहे.