
>> द्वारकानाथ संझगिरी
सिडनीची टी-20 मॅच संपली. हिंदुस्थानी संघाने टी-20 मालिका जिंकली आणि मी शॅम्पेनची बाटली उघडली. हार्दिक पांडय़ाच्या फटक्यांसारखी ती शॅम्पेन वर फसफसून आली. हिंदुस्थानी संघाच्या नावाने चिअर्स केले आणि पहिला ग्लास उंचावला तो हार्दिक पांडय़ासाठी.
मग नटराजनच्या स्पेलसाठी. तिसरा पुन्हा हार्दिक पांडय़ासाठी. कारण यशाची धुंदी चढावी अशा क्षणी तो महावीरासारखा शांत वाटला आणि त्याने म्हटलं, मॅन ऑफ दी मॅचचा खरा हक्क नटराजनचा आहे. त्याचं म्हणणं खरच होतं. गोलंदाजीची दुकानं पह्डली जात असताना नटराजनने आपल दुकान फोडू दिलं नाही. उलट फलंदाजांवर दहशत बसवली.
मग पुढचे ग्लास मी उंचावत गेलो, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरसाठी. विराटच्या ए. बी. डिव्हिलीयर्स स्टाइल फटक्यासाठी एक वेगळा ग्लास उंचावला. विराटने असा फटका यापूर्वी कधी मारला होता ते आठवत नाही. विराटला अशा फटक्यांची गरजही नसते. त्याशिवायच तो टी-20 त 50 धावांची सरासरी आणि 138 धावांचा स्ट्राइक रेट पेरवतो. पण तरी पुतूहल नक्की वाटलं. कदाचित त्याला दाखवायच होतं की, असा कुठलाही फटका त्याच्या पुवतीपलीकडला नाही. आणि शेवटचा ग्लास मी उंचावला तो पुन्हा हार्दिक पांडय़ाच्या त्या एका व्वाॊतव्यासाठी. ऑस्ट्रेलियाला 10, 15 धावा कमी पडल्या, असे तो म्हणाला. म्हणजे त्यांनी उभारलेल्या 194 धावा हा आमच्यासाठी सह्याद्री नव्हता हेच तो एका वेगळ्या स्टाइलमध्ये म्हणाला.
मला या संघाचा आत्मविश्वास प्रचंड आवडला. किशोरकुमारला यॉडलिंग जेवढं नैसर्गिकपणे जमायचं तितक्याच नैसर्गिकपणे आपला संघ टी-20 मॅच खेळतो आणि मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करतो.
एक गोष्ट कबूल करायला हवी की, ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी नवखी होती. आपल्या गोलंदाजांना तरी कुठे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांचा अनुभव होता. बुमराह नाही, शमीही नव्हता. पण आयपीएलने आपल्या सर्वच गोलंदाजांना जवळजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव दिलाय. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सिडनीच्या खेळपट्टीवर चहर, चहल आणि विशेषतः वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचे पृथक्करण अक्षरशः विद्रूप केलं. वॉशिंग्टन सुंदरला ते पचवणं कदाचित जड जाईल. कारण त्याला अशा विद्रूपपणाची सवय नाहीए. पण नटराजनने डोळे चोळायला लावले. त्याचा यॉर्पर पाहिला की गेल्या जन्मी शिकलेला यॉर्पर तो अजूनही विसरलेला नाही असे वाटते. पण त्याने उसळते चेंडू टाकले. चेंडूची दिशा व टप्पा फलंदाजाप्रमाणे बदलली आणि स्लोअर वनचा चांगला वापर केला. त्याचा धावा देण्यातला चिपूपणा पाहताना बुमराह आठवावा हाच नटराजनचा सन्मान आहे.
195 धावांचा पाठलाग करताना पहिली दोन षटके अशी होती की, जणू फटक्यांसाठी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 144 कलम जारी केलयं. टायने नो बॉल टाकला. त्यामुळे फलंदाजाला रिटर्न गिफ्ट मिळाली आणि मॅचने पूस बदलली (मला हा नियम गोलंदाजांसाठी अन्यायकारण वाटतो. नो बॉल टाकल्यामुळे एक अधिक बॉल गोलंदाजाला टाकावा लागतोच, वर एक धावसुद्धा मिळते. मग हा फ्री हिटचा जिजिया कर कशाला हवाय. फलंदाजांचे किती चोचले पुरवायचे). त्या फ्री हिटवर राहुलने अफाट सुंदर ऑफ ड्राइव्ह थेट प्रेक्षकांत धाडला आणि सर्व बेडय़ा तुटल्या. त्यात अलीकडे बरेच कर्णधार टी-20मध्ये आपल्या गोलंदाजांना प्रसाद दिल्याप्रमाणे एक एक षटकच का देतात तेच कळत नाही. गोलंदाजांनासुद्धा सेट व्हावं लागतं. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने मॅक्सवेलला तिसरं षटपं देण्याचा निर्णय घेतला. तो कदाचित समोर डावखुऱया धवनला पाहून. मॅथ्यू वेड द्रष्टा ठरला नाही, तो वेडा मात्र ठरला. धवन, राहुलने मॅक्सवेलच्या त्या षटकात 19 धावा लुटताना त्या षटकाच्या अंगावर लाजेपुरते कपडेसुद्धा ठेवले नाहीत.
त्यानंतर पाठलाग करताना हिंदुस्थानी संघाने अप्रतिम फलंदाजी केली. राहुल, धवनने उत्तम सुरुवात करून दिली. धवनने अर्धशतक ठोकलं. कोहली तर असा खेळत होता की, तो मॅच जिंकताना नाबाद असणार. मला संजू सॅमसनने पुन्हा दुःखी केलं. त्याने हार्दिक पांडय़ाशी शिकवणी ठेवावी. संजू सॅमसन त्याची अफलातून गुणवत्ता फुकून टाकतोय. त्याची फटक्यांची निवड पुन्हा पुन्हा चुकतेय. अरे तो पांडय़ा पाहा. सुरुवातीला त्याचा टायमिंग नीट होत नव्हता. तरीही त्याने शांतपणे वाट पाहिली आणि भरकटलेला टायमिंग वटणीवर आल्यावर मॅच संपवली. सॅमसनने ठरवायला हवं की त्याला दोन चाबूक फटक्यांचा फलंदाज व्हायचंय की फलंदाज म्हणून कारकीर्द उभारायची आहे. वेळ निघून चाललीय. टी-20 च्या हिंदुस्थानी संघाबाहेर पॅड लावून बसलेल्या फलंदाजांची फार मोठी रांग आहे.
हा पांडय़ा वेगळाच पांडय़ा वाटतो. तसा तो मला आयपीएलपासूनच वेगळा वाटायला लागलाय. तो फक्त निव्वळ फलंदाजीवर संघात आहेच. पण तो हिंदुस्थानी फलंदाजीचा महत्त्वाचा भाग झालाय. खालच्या क्रमांकावर येऊन प्रतिहल्ला चढवणारा फलंदाजांचा तो सेनापती झालाय. त्याची ती फटक्यामागची ताकद, त्याचे ते उंच फटके मारण्याचं काैशल्य पूर्वीसुद्धा होतं. आता त्याच्याकडे खेळायला भरपूर वेळ आहे असं वाटतं. बऱयाचदा चेंडू यायच्या आत तो योग्य पोझीशनमध्ये तयार असतो. फलंदाजीत त्याने प्रचंड शिस्त आणलीय. टी-20 त सुद्धा दोन-चार चेंडू नुसते न्याहाळून सेट व्हायला त्याला वावगं वाटत नाही. पण शिस्त आणताना त्याने फटके मारण्याची नैसर्गिक उर्मी अजिबात दाबून ठेवलेली नाहीए. ती उर्मी योग्य वेळी उसळी घेते. सहसा त्याचा शॉट सिलेक्शन चुकत नाही. जसं शेवटच्या षटकात घडलं. शेवटच्या षटकात दोन षटकारांची आवश्यकता होती. ती त्याने चहाचा घोट संपवावा त्या सहजतेने पूरी केली. त्याची ती पूर्वीची हेअरस्टाइल, क्रिकेटपटूच्या भाषेत सांगायचं तर तो चक्पूपणा. आता इतिहासजमा झालाय. एका नवीन गंभीर, बौद्ध भिक्षू वाटणाऱया पांडय़ाचा जन्म झालाय. त्याने त्याच्या शेवटच्या दोन षटकारांचे व्रेडिट बदललेल्या बॅटला दिलं. बॅट हे निमित्त आहे. त्याचे हातच गेंडस आहेत आणि त्या हातांना आता निर्मितीचे डोहाळे लागलेत.


























































