
हारमध्ये शिक्षणाच्या मुद्यावर एनडीएपासून वेगळे झालेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाहा यांची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी जवळीक वाढली आहे. परंतु, त्यांनी कृषी कायद्यावरून पंतप्रधानांवर टीका केली असून नितीश कुमार यांच्याशी मात्र स्नेह वाढविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एकमेकांचे विरोधक असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे उपेंद्र कुशवाहा यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना तेजस्वी यादव यांनी मर्यादा सोडून नितीश कुमार यांच्यावर टीका केली. याच संधीचा फायदा घेत उपेंद्र कुशवाहा यांनी तेजस्वी यांच्यावर तोंडसुख घेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांविरोधातील त्यांच्या अभ्रद भाषेचा चांगलाच समाचार घेतला. कुशवाहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने ट्वीट केल्यानंतर या दोघांमध्ये बैठक ठरली. 2 डिसेंबर रोजी उभय नेत्यांनी भेट घेतली. या बैठकीत नितीश कुमार यांनी विरोध सोडून एकत्र काम करूया असे कुशवाहा यांना आवाहन केल्याचे सांगितले जात आहे. आता यातील खरे काय आणि खोटे काय हे तर दोघेच जण जाणो. मात्र, राजकीय वतृळात मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे.



























































