
ब्रेक डान्स आता अधिकृतपणे ऑलिम्पिक खेळ झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) मंगळवारी याचा पॅरीस ऑलिम्पिकमध्ये (2024) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक डान्ससोबतच सरफिंग, स्केटबोर्डींग व स्पोर्टस् क्लायम्बिंग या तीन खेळांनाही ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे, अशी माहिती आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी याप्रसंगी दिली. स्पॉन्सर्स, ब्रॉडकास्टर व युवा प्रेक्षक यांच्याकडे पाहून आयओसीकडून चार नव्या खेळांना ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेक डान्सिंग म्हणजे काय?
1970 साली अमेरिकेत ‘ब्रेकिंग’ म्हणून ब्रेक डान्सिंगला ओळखले जात असे. हळुवारपणे ब्रेक डान्सिंग हिप हॉप संस्पृती म्हणून पुढे आली. त्यानंतर याचे अस्तित्व अमेरिकतच नव्हे, जगभरात जाणवू लागले. एक दशलक्षापेक्षा अधिक व्यक्ती हा खेळ खेळत आहेत.
500 खेळाडू कमी
या वर्षी होणारे टोकियो ऑलिम्पिक कोरोनामुळे आता पुढल्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये जवळपास 110091 अॅथलीटस् सहभागी होणार आहेत. मात्र 2024 सालामध्ये पॅरीस येथे होणाऱया ऑलिम्पिकमध्ये 10500 खेळाडूंनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. 500 खेळाडूंची कपात यावेळी करण्यात येईल, अशी माहिती आयओसीकडून देण्यात आली.
339 ऐवजी 329 स्पर्धा
खेळाडूंची संख्या कमी करण्यासोबतच क्रीडा शर्यतींवरही गदा आणण्यात आली आहे. त्यामुळे पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 339ऐवजी 329 इव्हेण्ट होणार आहेत. बॉक्ंिसग व वेटलिफ्ंिटग या दोन खेळांवर जास्त प्रमाणात कपात करण्यात आली आहे. दोन्ही खेळांमध्ये प्रशासनिक अनियमितता असल्यामुळे आयओसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.



























































