
टीम इंडिया ऑस्ट्रेलियासारख्या खडतर दौऱयावर असताना कर्णधार विराट कोहलीने पितृत्व रजा घेतली आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणाच्या काळात काळजी घेण्यासाठी बीसीसीआयने पहिल्या कसोटीनंतर त्याची सुट्टी मंजूर केली आहे. मात्र विराटच्या व बीसीसीआयच्या या निर्णयावर एका गटात जोरदार टीका केली. मात्र ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्हन स्मिथने कोहलीच्या पितृत्व रजेला समर्थन दिले आहे. क्रिकेटशिवाय आयुष्यात बरचं काही असतं, विराटच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करायला हवा, अशा शब्दांत त्याने टीकाकारांचे कानही टोचले.



























































