
हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केले.
एका क्रीडा वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान सुनील गावसकर म्हणाले, विराट कोहली हा गेल्या दहा वर्षांतील वन डे क्रिकेटमधला सर्वात प्रभावशाली क्रिकेटपटू आहे.
सुनील गावसकरांनी विराट कोहलीची स्तुती करताना पुढे म्हटले की, खेळाडूने किती धावा केल्या आहेत किंवा किती बळी बाद केले आहेत, याकडे फक्त मी बघत नाही. त्याचा प्रभाव किती पडला आहे याकडेही लक्ष देतो.
हिंदुस्थानच्या संघाने गेल्या दहा वर्षामध्ये मिळवलेल्या विजयात विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. धावांचा पाठलाग करताना त्याने टीम इंडियाला देदीप्यमान यश मिळवून दिले आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
हेडनचा धोनीला थम्स अप
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू याने मात्र गेल्या दहा वर्षांमधील वन डे क्रिकेटचा प्रभावशाली खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. मॅथ्यू हेडन यावेळी म्हणाला, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलीय. माझ्या दृष्टीने वर्ल्ड कप अत्यंत मोलाचा आहे, असेही तो पुढे म्हणाला.
























































