
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटण्याचे प्रमाण सुरूच असून गेल्या 24 तासांत 680 कोरानाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या 290023 झाली असली तरी यातील 2 लाख 65 हजार 760 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आता केवळ 12 हजार 464 सक्रिय कोरोना रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली. गेल्या एकाच दिवसांत मुंबईत 478 जण कोरोनामुक्त झाले आहेत.





























































