कोरोनामुळे पाश्चात्य देशांत वाढताहेत घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
divorce

कोरोनाचा आणखी एक जगावेगळा परिणाम युरोपातून समोर येऊ लागला आहे. कोरोनामुळे सामाजिक आर्थिक तणावात वाढ असह्य होत असल्यामुळे अमेरिका व युरोपियन देशांमध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. मात्र ही सुरुवात असून भविष्यात परिस्थिती खूपच चिघळणार असल्याचा इशाराही तज्ञांनी दिला आहे.

कोरोनामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने रोजच्या जगण्यातले ताण वाढले आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या नात्यावर झाला आहे. त्यामुळे लोक विभक्त होण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. बीबीसीच्या एका अहवालानुसार, ज्या जोडप्यांनी यापूर्वी कधीच घटस्पह्टाचा विचारही केला नव्हता त्यांचे आता घटस्फोट होऊ लागले आहेत. कोरोना संकटापूर्वी ज्यांनी कधीच एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार केला नव्हता. त्यांचे नाते कोरोना लॉकडाऊनच्या काळात घटस्पह्टापर्यंत येऊन पोहोचले आहे.

जुलै ते ऑक्टोबरदरम्यान घटस्फोटांच्या प्रक्रियेसाठी तब्बल 122 टक्के अधिक चौकशी झाली आहे. आपले नाते संपुष्टात आणण्यासाठी ऑनलाइन सल्लागारही शोधले जात आहेत. अमेरिकेतील लॉ फर्मच्या माहितीनुसार, घटस्फोटांच्या करारपत्रांच्या विक्रीत 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.