Video – उत्तर प्रदेशात 2022 च्या निवडणुकीत उतरणार ‘आप’, केजरीवाल यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेली विधानसभा निवणूक लढवण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशात प्रत्येक पक्षाचं सरकार आलं, मात्र आपलं घर भरण्याशिवाय कोणीही उत्तर प्रदेशासाठी काही केलं नाही. आज यूपीमधील लोकांना लहान-लहान सुविधांसाठी दिल्लीत का यावे लागले.’

केजरीवाल म्हणाले, ‘उत्तर प्रदेशमधील सर्व पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत प्रत्येक सरकारने एकमेकांना मागे टाकले. दिल्लीत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील बर्‍याच लोकांनी आम्हाला बर्‍याच वर्षांत सांगितले आहे की, उत्तर प्रदेशही दिल्ली सारखं समृद्ध राज्य बनण्यास पात्र आहे.’

केजरीवाल पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये योग्य आणि स्वच्छ राजकारणाचा अभाव आहे. हे फक्त आम आदमी पक्षाचं देऊ शकतं. म्हणून आम आदमी पक्ष 2022 मध्ये उत्तर प्रदेशात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.