फसवणूक करणारा टीव्ही कलाकार गजाआड, फसवणुकीसाठी जायचा विमानाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱयाला कलाकाराला क्राईम ब्रँच युनिट 8 ने अटक केली. सलमान ऊर्फ अॅक्टर फिरोज जाफरी (40) असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी पटेलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सलमान हा इराणी टोळीचा आहे. तो फसवणूक करण्यासाठी परराज्यात विमानाने जातो. पटेलनगर पोलिसांनी युनिट 8 ची मदत घेतली. त्यानंतर युनिट 8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांच्या पथकातील लक्ष्मीकांत शेलकर, प्रथमेश विचारे, अमीत देवकर आदीनी तपास सुरु केला. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून सलमानला जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेतले.