
रुग्णाच्या पोटातून एक- दोन नव्हे तर चक्क 639 लोखंडी खिळे कोलकाताच्या डॉक्टरांनी काढले आहेत. प्रदीप ढाली काव असे या इसमाचे नाव असून ते गोबरडांगा येथे राहणारे आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरही हैराण झाले.
डॉक्टरांनी लोहचुंबकाची मदत घेऊन पोटातील खिळे बाहेर काढले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये प्रदीप काव यांना दाखल केले होते. ते नैराश्यात माती आणि खिळे खायचे, अशी माहिती समोर आली आहे.





























































