
पुण्यातील दोन शाळकरी विद्यार्थीनींनी खगोल विज्ञान क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यांनी मंगळ आणि गुरूदरम्यान सहा नवे लघुग्रह शोधले आहेत. कलाम सेंटर आणि आंतरराष्ट्रीय एस्टॉनॉमिकल सर्च कोलॅब्रेशनच्या वतीने ही लघुग्रह शोध मोहीम आयोजित केली होती. यासाठी निवडलेल्या 22 विद्यार्थ्यांना दोन ग्रहांच्या कक्षातील स्थिती आणि पृथ्वीजवळील संभावित लघुग्रहांच्या विशेषणाकरिता प्रशिक्षण दिले होते. त्यात सर्व स्पर्धकांनी 27 प्राथमिक लघुग्रहांचा शोध लावला. यापैकी सहा लघुग्रहांचा शोध पुण्यातील आर्या पुळाटे आणि श्रेया वाघमारे या विखे पाटील शाळेच्या विद्यार्थिनींनी लावला.






























































