
लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेल्या कापड गिरण्या पूर्ववत सुरू कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भायखळा येथील एनटीसी संचलित इंदू मिल 5 या गिरणीला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यास व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनकडून (एनटीसी) मुंबईतील इंडिया युनायटेड मिल नंबर 5, पोदार मिल आणि टाटा मिल या कापड गिरणी चालवल्या जातात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या गिरणी बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी भायखळा येथील इंदू मिल 5 ला भेट देऊन कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी त्यांनी बंद गिरण्या पूर्ववत सुरू कराव्यात अशीही मागणी केली.
यावेळी राज्य सरकारकडून वीज बिलात सवलत मिळावी, प्रलंबित टीडीआरचा निधी एनटीसीला मिळावा अशा मागण्या व्यवस्थापनाने सुप्रिया सुळे यांच्याकडे केल्या. या बैठकीला कामगारांच्या वतीने माजी नगरसेवक अरुण नरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदपुमार काटकर, रवी सुर्वे, सुनील पवार, उमेश येवले, विजयपुमार वारंग, आर. डी. बाईत, भिकाजी साळुंखे, सी. टी. सावंत, सत्यम केसरकर, सचिन नारकर, वैशाली कडणे, स्वाती माने, प्रज्ञा चिंदरकर, सुरेखा पेडणेकर, प्रसाद म्हापुसकर, ग्यानसिंग ठापूर आदी उपस्थित होते.
शेतकऱयांना पैसे नको, तर न्याय हवाय! सुप्रिया सुळेंचा संताप
केंद्रातील भाजपचे सरकार शेतकऱयांचा सन्मान करत नाही. सर्वकाही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही. शेतकऱयांना पैसे नको, तर त्यांना न्याय हवाय, असा संताप राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱयांकडून विरोध होत आहे. शेतकरी आंदोलनाला 30 दिवस पूर्ण झाले तरी त्याची दखल घेतली जात नाही. यावरून केंद्रातील सरकार शेतकऱयांबाबत किती असंवेदनशील आहे हे दिसून येत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकऱयांवर अन्यायकारक धोरण लादण्याऐवजी चर्चा करून मार्ग काढायला हवा, असे त्या म्हणाल्या.




























































