
दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 82 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा कर्णधारपदाला साजेसा खेळ करत असून शतक ठोकले आहे. हे त्याचे कसोटीतील 12 वे शतक आहे. रविंद्र जाडेजाच्या साथीने 104 धावांची पार्टनरशिप केली आहे. ऱविंद्र जाडेजा देखील चांगला खेळ करत असून तो 40 धावांवर होता. दिवसाअखेरपर्यंत टीम इंडियाने 5 बाद 277 धावा केल्या आहेत
Captain @ajinkyarahane88 leading from the front. Brings up a brilliant century. His 12th in Test cricket #AUSvIND pic.twitter.com/23w9KS57fw
— BCCI (@BCCI) December 27, 2020
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी टीम इंडिया 1 बाद 36 धावांवर होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुभमन गिल व चेतेश्वर पुजाराने खेळाला सुरुवात केली. मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या शुभमन गिलला कमिन्सने माघारी पाठवले. त्यानंतर अवघ्या तीन धावांनंतर चेतेश्वर पुजारा देखील बाद झाला. हमुमा विहारी (21) व रिषभ पंत (29) धावा करुन परतले.
कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचे कल्पक नेतृत्व… पदार्पणवीर मोहम्मद सिराजची लक्षवेधी कामगिरी… आणि जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ‘टीम इंडिया’ने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला दिवस गाजवला. हिंदुस्थानच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत यजमान ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 72.3 षटकांत 195 धावसंख्येवर रोखले. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानने उर्वरित 11 षटकांच्या खेळात 1 बाद 36 धावांपर्यंत मजल मारली होती. मयांक अग्रवालला मिचेल स्टार्पने पहिल्याच षटकात शून्यावर पायचीत केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पदार्पणवीर शुभमन गिल 28, तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर खेळत होते.
पहिल्या कसोटीत तिसऱयाच दिवशी मानहानिकारक पराभव पत्करावा लागलेल्या हिंदुस्थानने दुसऱया कसोटीत नाणेफेक गमाविल्यानंतरही पहिल्या दिवशी वर्चस्व गाजविले. जसप्रीत बुमराहने पाचव्याच षटकात जो बर्न्सला शून्यावर माघारी धाडून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर दुसरा सलामीवीर मॅथ्यू वेड (30) व आलेला मार्नस लाबुशेन (48) ही जोडी जमत असताना प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने रविचंद्रन अश्विनला मोर्चावर आणले. या फिरकीपटूने वेडला जाडेजाकरवी झेलबाद करून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. पुढच्याच षटकात त्याने आलेल्या स्टीव्हन स्मिथला भोपळाही फोडू न देता पुजाराकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला मोठे यश मिळवून दिले.


























































