नवे वर्ष, नवी दिनदर्शिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईतील विविध संस्थांनी आणि सामाजिक संघटनांनी मुंबईकरांच्या सेवेसाठी दिनदिर्शका प्रकाशित केल्या आहेत. नववर्षांतील कामांची आखणी करण्यासाठी घराघरांत उपयोगी ठरणाऱया या दिनदर्शिकांचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

खार पूर्व येथील कृपासिंधू सामाजिक संस्थेच्या वतीने दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील मांजरेकर, गणेश कदर, संजय जैन आदी उपस्थित होते.

विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार वॉर्ड क्र. 28 चे नगरसेवक एकनाथ (शंकर) हुंडारे यांनी बनविलेल्या 2021 दिनदर्शिकेचे प्रकाशन परिवहनमंत्री विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधानसभा संघटक संतोष राणे, नंदकुमार मोरे,संतोष धनावडे उपस्थित होते.