खारमध्ये तरुणी गच्चीवरून पडली, दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खार येथील 14 व्या रस्त्यावर असलेल्या भगवती हाईटस या इमारतीच्या गच्चीवरून तरुणी पडून मृत्यूमुखी पडल्याप्रकरणी खार पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व मृत्यूमुखी पडलेली तरुणी उच्चभ्रू कुटुंबातील असल्याचे समजते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

थर्टी फस्ट नाईटला भगवती हाईटस या इमारतीच्या गच्चीवर काही तरुणांनी पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी संपल्यानंतर एक तरुणी गच्चीवरून खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राथमिक तपास केल्यानंतर खार पोलिसांनी दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्या दिवशी नेमके काय झाले ते मात्र समजू शकले नाही.