ममता बॅनर्जी राक्षसी संस्कृतीच्या; त्यांच्या डीएनए मध्येच दोष, भाजप आमदाराची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राक्षसी संस्कृतीच्या आहेत, तसेच त्यांच्या डीएनए मध्येच दोष असल्याची टीका उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा उत्तम पंतप्रधान आहेत असेही सिंह म्हणाले.

आपल्या वादग्रस्त विधानांसाठी आमदार सुरेंद्र सिंह नेहमीच चर्चेत असतात. आज त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. कोलकातामध्ये सुभाष चंद्र बोस यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांतून काहींनी जय श्री रामचे नारे दिले. त्यावर मुख्यमंरी बॅनर्जी नाराज झाल्या. त्यावर टीका करताना सुरेंद्र सिंह म्हणाले की, बॅनर्जी यांच्या डीएनने मध्येच दोष आहे. त्यांची संस्कृती राक्षसी आहे. कुठलाही राक्षसी संस्कृतीचा व्यक्ती भगवान रामावर प्रेम करू शकतो का ? नाही, ममता बॅनर्जी यांना भगवान राम बद्दल घृणा असणे स्वाभाविक आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रमाणे हिंसा होत आहे, त्यानुसार बॅनर्जी या राक्षसी संस्कृतीच्या असल्याचे सिद्ध होत आहे असेही सिंह म्हणाले.

आमदार सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना करताना म्हटले की, मोदी हे वाजपेयींपेक्षा उत्तम पंतप्रधान आहेत. मोदींनी शेतकर्‍यांच्या हितासाठी चांगली पावले उचलली आहेत. आतापर्यंत कुठल्याच पंतप्रधनांनी  असे केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आणि जवानांसाठी खुप चांगली कामे केली आहेत असेही सिंह यांनी नमूद केले आहे.