कोथरुडमध्ये अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयिनाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपहरण करण्यात आलेल्या 11 वर्षांच्या मुलाचा डोक्यात मारहाण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोथरुडमध्ये उघडकीस आला आहे. त्याचा आज दुपारी मृतदेह आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुलाचे अपहरण करण्यात आले होते.

याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विश्वजीत वजारी (वय 11) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. विश्वजीत हा केळेवाडी परिसरात कुटुंबीयासोबत राहत होता. मागील दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. याबाबत नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध कोथरुड पोलीस घेत होते. रविवारी दुपारी विश्वजीतचा मृतदेह केळेवाडी परिसरात मिळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याच्या डोक्यात मारहाण करून खून करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

दोन दिवसांपूर्वी विश्वजीतचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू होता. आज दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.
बाळासाहेब बडे, पोलीस निरीक्षक, कोथरूड पोलीस ठाणे