
हिंदुस्थानात शेतकरी आंदोलन सुरू असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्ली आणि इतर भागात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात अनेक शेतकऱ्य़ांचा मृत्यूही झाला आहे. संपूर्ण देशच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरातून या आंदोलनाल पाठिंबा मिळत आहे. अशा वेळी अमेरिकन पॉप गायिका रिहानाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री कंगणा रनौतने या आंदोलकांना दहशतवादी म्हटले आहे.
रिहानाने शेतकरी आंदोलनाची एक बातमी शेअर करून म्हटले आहे की आपण याबद्दल का नाही बोलत?
why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
हे ट्विट कंगणाने रीट्विट करत म्हटले आहे की, या बद्दल कोणीच बोलत नाही कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत. हे लोक देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत मग चीन हिंदुस्थानवर आक्रमण करेल आणि चीनची वसाहत होईल जशी अमेरिका आहे. तु मुर्ख असून तुमच्या सारखे आम्ही आमचा देश विकायला नाही काढला असे कंगणाने म्हटले आहे.
No one is talking about it because they are not farmers they are terrorists who are trying to divide India, so that China can take over our vulnerable broken nation and make it a Chinese colony much like USA…
Sit down you fool, we are not selling our nation like you dummies. https://t.co/OIAD5Pa61a— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 2, 2021
तर दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्करने रिहानाच्या ट्विटला समर्थन देत कंगणाला उत्तर दिले आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानानंतर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि मॉडेल अमेंडा सेर्नीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
We stand in solidarity with the #FarmersProtest in India.
https://t.co/tqvR0oHgo0— Greta Thunberg (@GretaThunberg) February 2, 2021
अमेंडा सेर्नीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, शेतकरी प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला हिंदुस्थानी किंवा पंजाबी असणे गरजेचे नाही. तुम्ही माणूस असणे गरजे आहे.


























































