तोकड्या कपड्यात मॉडेल करत होती विमान प्रवास… पुढे जे घडलं ते होतं धक्कादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मॉडेल इजाबेलसोबत विमानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इजाबेल विमानात तोकडे कपडे घालून प्रवास करत होती तिच्या त्या कपड्यांवर विमानातील केबिन क्रूने आक्षेप घेत तिला जॅकेट घालायला दिले. इजाबेलसाठी हा प्रकार लाजिरवाना होता. तिने या प्रकाराबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहली आहे.

इजाबेल तिच्या पती सोबत गोल्ड कोस्टवरून मेलबर्नला जाण्यासाठी जेटस्टारच्या विमानाने प्रवास करत होती. त्यावेळी तिने काळ्या रंगाचे क्रॉप टॉप आणि ब्लु जिन्स घातली होती. ती तिच्या पतीसोबत फ्लाईटमध्ये बसलेली असताना एक एअर होस्टेस तिच्याजवळ आली व तिने तुमच्याकडे जॅकेट आहे का विचारले. यावर इजाबेलने नाही असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने ती एक जॅकेट घेऊन आली. त्यावर इजाबेलने विचारले की हे कशासाठी त्यावेळी त्या एअर होस्टेसने तिचे कपडे आक्षेपार्ह असल्याचे सांगितले. ते ऐकून इजाबेलला धक्का बसला. पण तिला फ्लाईटमधून उतरवतील या भीतीने तिने गप्पपणे ते जॅकेट घातले.

‘हा अनुभव माझ्यासाठी धक्कादायक होता. मी काय घालावे हे दुसऱ्यांच्या मतावर कसे काय अवलंबून असू शकते. हे 1921 नाही तर 2021 आहे. फ्लाईटमध्ये चढण्याआधी दोन तीन ठिकाणी आमचं चेकिंग झालं. तिथे कुणीच माझ्या कपड्यांवर आक्षेप घेतला नाही’, असे इजाबेलने सांगितले. या घटनेनंतर जेटस्टारने इजाबेलचे माफी मागितली आहे.